नाशिक मिरर वेबटीम : प्राचीन घटनेतील आठवणी चा गौरव म्हणून नाशिक परिसरातील ओझर येथील विमानतळाला जटायू विमानतळ हे नाव देण्यात यावे.
अशी मागणी विश्व हिंदू सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र शिंदे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे कि, नाशिक मध्ये विमानतळ झालेले असून त्याबाबत नाशिक करांना आनंद आहेतच या निमित्ताने प्राचीन घटनेतील आठवणींचा गौरव म्हणून सदरील विमानतळाला जटायू हे नाव देण्यात यावे.कारण नाशिक शहरात प्रभू श्रीराम,लक्ष्मण भगवान व माता सीता हे काही काळाकरिता वास्तव्यास होते.त्या दरम्यान रावणाने साधूचा वेश परिधान करून माता सीतेचे नाशिक येथील पंचवटी परिसरातून अपहरण करून घेऊन जात असताना जटायू पक्ष्याने माता सीतेचा आक्रोश ऐकून सर्व शक्तीनिशी रावणाचा विरोध.करत रावणा बरोबर प्राणाची पर्वा न करता युद्ध केले. परंतु युद्धात जटायू या पक्ष्याचे रावणाने पंख छाटून धारातीर्थ पाडले.माता सीतेच्या शोधात प्रभू श्रीराम जात असताना जटायूच्या वेदनापूर्वक आवाज ऐकून प्रभू श्रीरामाने आपल्या अलौकिक बाणाच्या प्रहाराने धरतीतून पाणी प्रकट करून टाकेद सर्वतीर्थ क्षेत्र या ठिकाणी जटायू पक्षाला पाणी पाजले व माता सीतेच्या अपहरणा संदर्भात संपूर्ण माहिती घेतली.आज आपल्या आजूबाजूला रावणरूपी माणसांची संख्या वाढतच चाललेली आहे.त्यांना रोखण्यासाठी जटायू विरळ होत चाललेला आहे.त्यामुळे माता सीतेच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या जटायूचे नाव विमानतळाला दिल्यास सर्व मानव जातीला संदेश मिळेल किं जटायू आजही अस्तित्वात आहे.आपण या विमानतळाचे नामकरण जटायू विमानतळ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी विश्व हिंदू सेना संस्थापक अध्यक्ष
अँड.महेंद्र शिंदे,अमोल इघे, दीपक आरोटे,अँड.निलेश पाटील, अँड.विशाल जाधव,अँड.निलेश चौधरी,कपिल अहिरे,संदीप भंदुरे,सचिन काठे,डाँ.अमोल वाजे, धीरज कोळंबे,दीपक सूर्यवंशी, वैभव दिघे,अयोध्या यादव, भावनेश लोहरकर,ग्यान सिंग,परमिंदर सैनी.सुजित यादव, राजमन यादव,शिव कुमार पांडे,प्रमोद पांडे,आनंद पाटील,सिद्धू खोचे,अर्जुन शिंदे,दत्ताजी ढोकळे ,शैलेश सावजी,विशाल साळवे ,चेतन रायते,अक्षय लोंढे,शशांक सिंग,अमित कुमार,शिवम तिवारी,शुभम शिंदे,प्रसाद वाघ,प्रशांत सहाणे,मनोज वाळुंज आदीसह.विश्व हिंदू सेनेचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
