नाशिक मिरर : नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोठ्या प्रमाणात मूलभूत समस्या असून सदर समस्या कडे स्थानिक लोकप्रतिनिधी दृलक्ष करीत आहेत.सदर समस्या सोडविण्याची मागणी सविता गायकर,संगीता उबाळे ,कल्पना बैरागी, प्रियंका गायकर आदीनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या कडे समस्या बाबत लेखी निवेदन देऊन केली आहे. प्रभागातील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडूपे वाढली असून त्यावर कचरा घाणीचे साम्राज्य झाले आहे. मोकाट कुत्रे व जनावरे संख्या वाढली आहे. प्रभागातील उद्याने ग्रीन जिम त्यामधील साहित्य नादुरुस्त झाले आहे.प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
प्रभागातील कार्बन नाका येथे असलेल्या भाजी बाजाराला अधिकृत मंजुरी द्यावी व त्या ठिकाणी मोठे स्ट्रीट लाईट लावण्यात यावे. स्वतंत्र जागेमध्ये मटन मार्केट ची सुद्धा उभारणी करावी. वेगवेगळ्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार करावी.कामाला जाण्याच्या व येण्याचा वेळेत अवजड वाहनांस प्रवेश बंदी करावी.कार्बन नाका येथील नवीन मनपा शाळा विद्यार्थी साठी ई-उदघाटन करून सुरू करावी, प्रभागामधील अनेक स्ट्रीट लाईट हे बंद आहेत ती सूरु।करण्यात यावी. प्रभागातील अनेक ठिकाणी विद्युततारा,विद्युत वाहिनी पोल हे नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करावीत.विजतारा भूमिगत कराव्यात.यासह इतर समस्या प्रभागात असून त्या त्वरित सोडवण्यात यावे, अन्यथा सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना व नागरिक यांच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा करण गायकर,सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, महेश आहेर, एमडी शिंदे ,सम्राट सिंग, नवनाथ शिंदे, सचिन निकम, मनीषा गांगुर्डे आदीनी दिला आहे.

