नाशिक मिरर  : नाशिक मनपा विभागातील सर्व विभागात जेष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण केंद्र सुरू झाले आहे .मात्र सातपूर भागात अद्याप कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू झालेले नाही. सातपूर भागात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस फैलाव होत आहे.सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये मोठ्या संख्येने कामगार परिसरातुन जातात.त्यामुळे सातपूर विभागात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या कडे लेखी निवेदन रा.यु.कॉ चे नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नितीन निगळ, निलेश भंदुरे रा.यु.कॉ युवक अध्यक्ष, कल्पेश कांडेकर,  रामदास मेदगे आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!