अध्यक्षपदी मोहन अढांगळे तर कार्याध्यक्षपदी योगेश गांगुर्डे यांची निवड
बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित महासूर्य हे महानाट्य
नाशिक मिरर वेबटीम :  सातपूर डॉ .बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती च्या वतीने   डॉ.बाबासाहेब आबेडकर जयंती उत्सव दि.१४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. जयंती उत्सव अध्यक्षपदी मोहन  
अढांगळे ,तर कार्याध्यक्षपदी योगेश  गांगुर्डे,उपाध्यक्षपदी निलेश भंदुरे  यांची सर्वमताने निवड करण्यात आली आहे.  सातपूर सर्वपक्षीय जयंती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती , यामध्ये माहिती देण्यात आली.  उत्सव समितीतर्फे या वेळी परिसरात  मिरवणूक  न काढता  भारत रत्न   डॉ.बाबासाहेब   आंबेडकर  यांच्या विचारणे प्रेरित जयंती  साजरी करण्यात येणार आहे. यावेळी विविध प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  सातपूर   ईएसआय मैदान येथे   बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित महासूर्य हे महानाट्य व   भगवान गौतम बुद्ध च्या जीवनावर आधारित ‘तथागत’ हे  महानाट्य  व  इतर  प्रबोधन कार्यक्रम  घेण्यात येणार असल्याचे माहिती  समिती सदस्य बजरंग शिंदे यांनी दिली.बाबासाहेबांची जयंती ही फक्त समाजापूर्ती  मर्यादित  न राहता  सातपूर सर्वपक्षीय व सर्व बांधवांनी मिळून एक झेंडा एक जयंती करत प्रबोधन कार्यक्रम घेत साजरी करण्याचे आवाहन या वेळी केले. नगरसेवक तथा सातपूर प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, वसंत पंडीत,  अरुण काळे, बजरंग शिंदे,गणेश गांगुर्डे,   बिपीन कटारे,संजय तायडे,रवींद्र काळे,नंदू जाधव,विनोद काळे,राजू गोतिसे, विशाल भदर्गे, मनोज पगारे,राहुल पट्टेवर,सत्यवान चक्रे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवनिमित्ताने  कुठलेही पावती पुस्तक छापले जाणारं नाही. या वेळी २०० सदस्यांकडून वर्गणी गोळा करण्यात येणार आहे. बाबासाहेब विचारांनी प्रबोधन कार्यक्रम घेत  जयंती उत्सव  साजरी करणार आहे. विविध प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.- मोहन अढांगळे,जयंतीउत्सव अध्यक्ष सातपूर
बाबासाहेबच्या  विचाराने प्रेरित जयंती साजरी करण्यात येणार आहे.या पुढे एकच सर्वपक्षीय जयंती सातपूर ला साजरी करणार आहे.त्यात सर्व समाज घटकांचा समावेश असणार,मिरवणूक व इतर कार्यक्रम फाटा देत समाज प्रबोधन कार्यक्रम घेणार आहे.
– योगेश गांगुर्डे कार्यध्यक्ष सातपूर जयंतीउत्सव

बातम्या

Don`t copy text!