पत्रकार दिनानिमित्त राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरा कडून पत्रकाराचा सत्कार  
नाशिक मिरर वेबटीम : महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार होते.यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.
       पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सातपूर पत्रकार संघाच्या वतीने सातपूर- सिडको पत्रकार स्नेहमेळावा चे आयोजन हॉटेल मसाला मध्ये करण्यात आली.मेळाव्यात सातपूर – सिडको मधील पत्रकारांचा सत्कार जेष्ठ पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आला. व यावेळी कोरोना व्हायरस महामारी च्या काळात पत्रकारा ना बातमीदारी करतेवेळी कशा प्रकारे विविध परिस्थिती ना सामोरे जावे लागले.तसेच पत्रकारिता करीत असताना येणारे चांगले – वाईट अनुभव व इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मिसळ पार्टी चे छोटेखाणी आयोजन केले होते.यावेळी सर्व पत्रकाराचा शालपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सातपूर ,अंबड, सिडको ,गंगापुर विभागातील पत्रकार रवींद्र केडीया, गोकुळ सोनवणे, मनोज घोणे, विशाल देशपांडे,वसंत आव्हाड,सतीश निकुंभ, नामदेव पवार, ज्ञानेश्वर आंधळे, परमेश्वर आंधळे, कमलाकर तिवडे, मदन बोरसे, सुनील पगारे, राजू अनमोला, संदीप रोकडे, रमेश खरात,सिद्धार्थ लोखंडे, तुषार ढेपले, विजय आव्हाड,मच्छिंद्र आव्हाड, बंडी आढाव,नंदकुमार जाधव आदी सह सिडको च्या पत्रकार बांधव उपस्थित होते.
तसेच सातपूर मधील छत्रपती शिवाजी विद्यालय, रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, दिपक लोंढे ,शिवसेनेचे सातपूर विभाग प्रमुख योगेश गांगुर्डे, भाजपाचे रामहरी संभेराव,रवींद्र उगले, राष्ट्रवादीचे नितीन निगळ, महादेव जनसेवक समिती चे अध्यक्ष विजय आहिरे,शिवसेना गटनेते विलास शिंदे आदीनी सातपूर पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा सत्कार केला.

बातम्या

Don`t copy text!