मुंबई, दि. ५ : राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेअन्स) मोहीम १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ज्या संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण राहिले आहे अशा गृहनिर्माण संस्थांनी या मोहिमेत सहभाग घ्यावाअसे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मंत्रालयात श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मानीव अभिहस्तांतरण मोहिमेसंदर्भात आढावा बैठक झाली.  सहकारमंत्री श्री.पाटील म्हणालेमानीव अभिहस्तांतरण हा सर्व गृहनिर्माण संस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ही मोहीम सकारात्मक दृष्ट्या आणि परिणामकारकरित्या राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सहज करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. मानीव अभिहस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत गृहनिर्माण संस्थांना महसूलनोंदणी महानिरीक्षक व इतर कार्यालयाकडून कागदपत्रे मिळण्यास विविध अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सहकारमहसूल आणि नोंदणी महानिरीक्षक यांची संयुक्त बैठक महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्याचे निर्देशही श्री.पाटील यांनी यावेळी दिले.

सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला म्हणाल्यागृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सहज आणि सुलभ करण्यासाठी ऑफलाईनसह ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करताना गृहनिर्माण संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यास मोहिमेवर निरीक्षण करण्यात सहजता येईल आणि गृहनिर्माण संस्थांनाही अर्ज करण्यात अडचणी येणार नाही.

सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणालेगृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या मोहिमेला लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तसेच लोकांचा सहभाग वाढविणे तितकेच महत्वाचे आहे. सहकार विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने सकारात्मकतेने काम करणे आवश्यक आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नवनवीन कल्पना आणि माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग करावा. तसेच प्रत्येक स्तरावर जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी क्षेत्रीय यंत्रणेला दिले.

आढावा बैठकीला सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लासहकार आयुक्त अनिल कवडेजिल्हा उपनिबंधक उपस्थित होते. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाच्या सद्यस्थिती संदर्भात  सादरीकरण करण्यात आले.

राज्यात दि. ३१ मार्च २०२० अखेर एकूण २,१२,९५१ नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. त्यापैकी १,०८,५५५ सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. म्हाडा अंतर्गत येणा-या संस्थाप्लॉटधारकांच्या संस्था आणि शासकीय जमीनवरील संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाची आवश्यकता नाही. मानीव अभिहस्तांतरणाची आवश्यकता नसलेल्या साधारण १२,०३५ संस्था आहेत. विकासक/जागा मालकाने अभिहस्तांतरण करुन दिलेल्या ११.५०७ संस्था आहेत. या बाबींचा विचार करता साधारणपणे ८५,०१३ संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण होणे बाकी आहे. मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया दिनांक २५ फेब्रुवारी २०११ पासून सुरु झाली. मानीव अभिहस्तांतरण धोरण अंतर्गत दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी एकूण १४,३७६ संस्थांच्या दाखल प्रकरणाबाबत जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्था यांनी निर्णय दिलेले आहेत,अशी माहिती यावेळी सादरीकरणात देण्यात आली.

मानीव अभिहस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे :

• मानीव अभिहस्तांतरणाकरीता नमूना 7 मधील अर्ज

• सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र / Deed of Declaration ची प्रत.

• संस्थेच्या/ कंपनीच्या साधारण सभेतील मानीव अभिहस्तांतरण करण्याबाबत केलेल्या ठरावाची प्रमाणीत प्रत.

• मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा (मालमत्ता पत्रक7/12 उतारा इ.)

• संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची/सभासदांची विहित नमुन्यातील यादी.

• सहकारी गृहनिर्माण संस्थेने/ कंपनीने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी अधिनियम 1970 अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस/पत्रव्यवहाराचा तपशिल व घटनाक्रम.

• नियोजन /सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.

• संबंधित संस्थेकडे / कंपनीकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या /दायित्वे स्विकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र.

तसेच मानीव अभिहस्तांतरण संबंधीतील शासन निर्णय व परिपत्रके आणि इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातम्या

Don`t copy text!