गावपातळीवर महाविकासआघाडी की भाजपा बाजी मारणार?

नाशिक मिरर वेबटीम :राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.दरम्यान, १४ हजारांवर ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी निवडणुका होत असल्याने गावागावांतील राजकारण चांगलंच तापणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील ही दुसरी लढत ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला होता. त्यानंतर आता ग्रामीण महाराष्ट्रात कोण बाजी मारतं, हे या निवडणुकांच्या निकालांतून कळणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे :

👉🏻निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : 15 डिसेंबर
👉🏻उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर
👉🏻उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
👉🏻उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप : 4 जानेवारी
👉🏻मतदान : 15 जानेवारी (सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच)
👉🏻मतमोजणी : 18 जानेवारी
निवडणुक निकालाची अधिसुचना प्रसिद्धी : 21 जानेवारीपर्यंत

बातम्या

Don`t copy text!