देश -विदेशातील पर्यटकांना देखील नाशिक फ्लावर पार्कचा मोह
नाशिक मिरर वेबटीम : जानेवारी मध्ये जागतिक स्तरावर दुबई येथील मिरकल गार्डनच्या धर्तीवर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले होते.परंतु कोरोना व्हायरस फैलाव मुळे लॉकडाऊन मार्च महिन्यातच बंद करावे लागले होते. त्र्यंबक रोड वरील अंजनेरी पर्वताच्या जवळ गेल्या वर्षी सुरू झालेले नाशिक फ्लॉवर पार्क आता नऊ महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा १८ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.
फ्लावर पार्क पहिल्या पेक्षा मोठ्या जागेत असणार आहे. नवीन संकल्पना व नवीन थीमचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधी मध्ये पार्कला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. मार्च महिन्यात सुरू झालेले लॉकडाऊन मुळे फ्लावर पार्कचा आनंद घेता न आलेल्या पर्यटकांना आता पुन्हा आनंद घेता येणार आहे. पार्क सुरू करताना कोरोनाव्हायरस संबंधी चे सर्व नियमांचे पालन करून रोज ठराविक पर्यटकांना इंट्री देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कल्पकता, संशोधन व स्थानिक मनुष्यबळाचा वापर करून हे उद्यान साकारले आहे.
यासाठी शशिकांत जाधव यांच्यासह प्रयोगशील शेतकरी गोकूळ पाटील व आर्किटेक्ट निधी पाटील यांनी योगदान दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सामूहिक कल्पकतेतून या फ्लॉवर पार्क उभारणीचे काम केले आहे.टाकाऊ घटकांचा अधिक वापर करून येथे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यामागील थीम मधील उद्यानात पिटोनिया, झेनिया, डायनथस, पॅन्सि, एरेंथियम, कोलिअस, वडेलिया, लेडीबर्ड कॉसमस आदी फुलझाडांची आकर्षक लागवड करण्यात आली होती. गुलाब, झेंडू, सूर्यफूल, कमळ, बोगनवेल या फुलांचाही या पार्कमध्ये समावेश आहे. या फुलांचा व विविध वेलींचा वापर करून मोर, हत्ती, शहामृग, शेतकरी आदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या पार्कमध्ये १२८ प्रकारची विविध फुले आहेत. फ्लॉवर पार्कमध्ये लाल माती, कोकोपीट व खतांच्या मिश्रणाचा वापर करून विशिष्ट आकाराच्या कुंड्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानात संपूर्णपणे सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. विविध जातींच्या रंगीबेरंगी फुलांचा समावेश
विविध जातींच्या, रंगांच्या शोभिवंत फुलझाडांची या पार्कमध्ये मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये पिटोनियाची २० रंगांची रोपे, झेनियाची ९ रंगांची तर डायनथसच्या ८० रंगांच्या रोपांचा समावेश होतो.आता नवीन थीम असल्याने नाशिककरांनी व देश-विदेशातील पर्यटकांनी सहकुटुंब एकदा नक्की भेट द्यावे असे ठिकाण आहे.
