स्मार्ट रेशनकार्ड जारी झाल्यानंतर शहरातील कोणत्याही रेशनदुकानात रेशन घेता येणार
नवी दिल्ली : नाशिक मिरर वेबटीम दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी रेशन कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. याच्या माध्यमातून या कुटुंबांना केंद्र सरकारकडून अनुदानित धान्य मिळते. अन्न विभाग द्वारा रेशन कार्ड देशातील सर्व राज्यांत दिले जाते. रेशन वितरण व्यवस्था सरळ आणि सुलभ करण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येत आहेत. ज्याद्वारे आपण आपल्या शहरातील कोणत्याही रेशन डीलरकडून आपल्या कोट्याचे रेशन घेण्यास सक्षम असाल.
स्मार्ट रेशन कार्डचा फायदा :
जर तुम्ही सामान्य रेशन कार्ड वापरत असाल तर तुम्हाला रेशन घेण्यासाठी तुमच्या भागातील रेशन डीलरकडे जावे लागेल. परंतु स्मार्ट रेशनकार्ड जारी झाल्यानंतर आपल्याला आपल्या शहरातील कोणत्याही रेशन डीलरकडून रेशन घेता येईलत्याच वेळी सामान्य रेशन कार्ड फाटल्याची किंवा तो कागदाचा बनलेला असल्यामुळे खराब होण्याची भीती देखील असते. त्याचबरोबर सरकारने दिलेली स्मार्ट रेशन कार्ड हे एटीएम कार्डासारखे प्लास्टिकचे बनलेले असेल. हे आपल्याकडे ठेवणे देखील सोपे होईल.
