नाशिककरांनी साथ दिल्यास शहर लवकरच कोरोना मुक्त

नाशिक मिरर वेबटीम : 

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने राज्यात नाशिक जिल्ह्या अव्वल ठरले आहे.गेल्या महिन्यापर्यंत वर असलेल्या कोरोना प्रादुर्भावाचा आलेख ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खालावला आहे.

राज्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के :
ग्रामिण भागात ९३.४४ टक्के तर शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के आहे. एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. वडाळागाव, पंचवटी विभागातील फुले नगर, अंबड लिंकरोडवरील संजीव नगर, सातपूर कॉलनी, सिडको हा भाग हॉटस्पॉट ठरला.मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरात दररोज पन्नासच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर मात्र कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिकरेड झोन मध्ये आले. जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांचा आलेख उंचावत राहिला. ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र आलेख खालावू लागला.

बरे होण्यात शहर आघाडीवर :

जून महिन्यात नाशिकमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर ४२.६० टक्के होता. जुलै महिन्यात त्यात वाढ होऊन रिकव्हरी रेट हा ७१ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. ऑगस्ट महिन्यात हा दर ८४ टक्क्यांवर पोहचला होता. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक ९१.०५ टक्के तर राज्याचा रिकव्हरी रेट ७५.०९ टक्के एवढा होता. ऑक्टोंबर महिन्यात रिकव्हरी रेटमध्ये आणखी वाढ झाली आहे. जिल्ह्यात ९३ हजार ९९ करोनाबाधितांपैकी ८६ हजार ९९४ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. चार हजार ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.शहरात २ हजार ५६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याच्या तुलनेत नाशिक शहर व जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ तर शहरात ९४.४५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ आहे.

Don`t copy text!