शिवसेना गटनेते विलास शिंदे यांचा पुढाकार नागरिकांनी मानले आभार
नाशिक मिरर : लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी, लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करून देखील स्लॉट न मिळणे, खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी ताटकळत उभे राहणे,अशी परिस्थिती सद्या नाशिक शहरात सर्व मनपा व खाजगी लसीकरण केंद्रावर आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये लस मिळावी यासाठी अनेक नागरिकांचे फोन शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे यांना येत होते.
परंतु प्रभागात गंगापूर गावात एकच लसीकरण केंद्र असल्याने व तेथे मोजकेचे ठोस उपलब्ध होत असल्याने ते गोर-गरिब नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.प्रत्येक नागरिकांना मोफत लस उपलब्ध होण्यासाठी मोठा कालावधी जाऊ शकतो, त्यामुळे गंगापूर व तेथील मध्यम वर्गीय व उच्चभ्रू परिसरातून आम्हाला पैसे देऊन तरी लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी विलास शिंदे यांच्याकडे केली होती.त्यानुसार शिंदे यांनी नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव व वैद्यकीय अधिकारी यांची परवानगी घेऊन नाशिकचे सह्याद्री हॉस्पिटल विद्यमाने सिरीन मिरोज मधील रहिवासी भागातील अपार्टमेंट व सोसायटी मध्ये जाऊन नागरिकाचे लसीकरण करण्यात आले.आज दि.२६ रोजी पहिल्या दिवशी ५५० नागरिकांनी लसीकरण करून घेतले असून, आजच ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी बुकिंग केली आहे.
नाशिक शहरात हा पहिला प्रयोग असून, त्यानुसार नागरिकांच्या मागणी नुसार अपार्टमेंट मध्ये जाऊन प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांचे लसीकरण करून संपूर्ण प्रभागात लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे विलास शिंदे यांनी नाशिक मिरर न्यूज सोबत बोलते वेळी सांगितले.यावेळी डॉ.अमोल वाजे उपस्थित होते.सर्व नागरिक यांनी नगरसेवक शिंदे यांचे आभार मानले.

