नाशिक मिरर वेबटीम: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या नव्याने तयार होणाऱ्या संसर्गाविषयीच्या चिंतेच्या प्रश्नाला उत्तर देताना आणि ब्रिटनहून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी करताना ते म्हणाले, की “मी हे सांगू इच्छितो की ही काल्पनिक परिस्थिती आहे, या सर्वांपासून स्वत: ला दूर ठेवा.” सरकारला सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. या पत्रकार परिषदेत जी भिती व्यक्त केली जात आहे. तितकं घाबरुन जाण्याची काही गरज नसल्याचे हर्षवर्धन म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठा निर्णय.
- राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांत उद्या दि. 22 डिसेंबरपासून ते 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी.
- संचारबंदी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी (Christmas celebration guidelines) नागरिकांना संयम पाळावा लागणार आहे. कारण रात्री 11 नंतर नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी (Night curfew in maharashtra ) जाहीर केली आहे.ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार ((New strain of virus in UK) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली.
राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
