नाशिक मिरर :
        सातपूर विभागात कोविड १९ चे एकूण २६८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रोज सरासरी सातपूर विभागात ४० नवीन रुग्ण आढळून येत होते.परंतु सोमवार दि.७ रोजी नवीन रुग्णांची संख्या शून्या वर होती.त्यामुळे सातपूरकरासाठी दिलासा देणारी बाब आहे. तर वर्षभरात आतापर्यंत एकूण १७९ रुग्ण आपले प्राण दगावले आहेत.
          सातपूर विभागातील एकूण ३९ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे. सातपूर – अंबड औद्योगिक वसाहती मध्ये लाखो कामगाराची कामानिमित्त रोजची रहदारी असते.सातपूर -अंबड,सिडको औद्योगिक वसाहतीमध्ये स्वरूपी वास्तव्यास आहेत.कामानिमित्त रोज शेकडो कामगारांशी एकमेकांचा संपर्क येतो.परंतु अद्याप औद्योगिक वसाहती मध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे.कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन सूचना केल्या असून त्याची  अंमलबजावणी करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे.नाशिक जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने दुपारी ४ पर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे.परंतु परिसरातील नागरिक व व्यापारी, दुकानादार नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदार पणे वागत असल्याचे दिसुन येते. दुपारी ४ नंतर दुकाने बंद करण्यास सांगून देखील बऱ्याच ठिकाणी दुकाने उघडी असतात.मास्क चा वापर न करणे, सामासीक अंतर न पाळणे, गर्दी करणे आदी कृती करून कोरोना व्हायरस फैलावनास कारणीभूत ठरू शकते.
पोलीस व मनपा प्रशासन अधिकारी व कर्मचारी बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करत आहेत.परंतु तरी देखील नागरिक कोरोना व्हायरस च्या गांभीर्याने घेत नसल्याने दिसून येत आहे.कारखान्यामध्ये देखील सुरुवातीला सर्व नियमांचे पालन केले जात होते.परंतु आता काही बड्या कंपन्या सोडल्या तर इतर कंपन्या मध्ये तापमान चेक करणे, आरोग्य तपासणी करणे, कामाचे ठिकाण सॅनिटाईझ करणे, आदी नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे.सदर नियमांचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक आहे. सातपूर विभाग मध्ये  नोडल अधिकारी उपायुक्त करुणा डहाळे ,  विभागीय अधिकारी नितीन नेर , नोडल वैद्यकीय अधिकारी कोशिरे कोविड १९ ची  नवीन रुग्ण संख्या शून्या वर आणण्यास महत्व पूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत.   तसेच पर्यवेक्षक सुरेश खांडबहाले, नितीन देशमुख, प्रकाश शेवाळे, शेखर धुमाळ, प्रमोद पाटील सर्व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, सिस्टर,कर्मचारी तसेच  टीममधील मधील शिक्षक, आंगणवाडी सेविका  सातपूर विभागातील ऍक्टिव्ह रुग्णांना मदत करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!