सातपूर मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात २५  पिशव्या संकलित
नाशिक मिरर :   नाशिककरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन तसेच संकटकाळात त्यांना विविध मार्गाने मदत करून शिवसेनेने त्यांच्याशी एकप्रकारे रक्ताचे  नातेच निर्माण केले आहे,असे प्रतिपादन माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनी केले.    शिवसेना पदाधिकारी नरेश सोनवणे व महिला पदाधिकारी डाॕ. वृशाली सोनवणे यांच्या पुढाकाराने अंबिका स्वीटमार्ट,अशोकनगर येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बागूल बोलत होते.
  माजी मंत्री बबनराव घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड,माजीआमदार वसंतराव गिते,माजी महापौर विनायक पांडे,माजी शिक्षण मंडळ सदस्य राजेंद्र देसाई,महिला पदाधिकारी आलका गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिबिरात किशोर काशिद,उज्वल पिंगळकर, निरंजन लाया,आदित्य पाटील,अभिषेक दाते,प्रवीण कुटे, दत्तात्रेय अवसरकर,रोशन चेवले, द्यनेश्वर पवार आदींसह २५  शिवसैनिकांनी रक्तदान केले. शिवसेनेने आयोजित केलेल्या २३ शिबिरांद्वारे आतापर्यंत १ हजार २४५ हून अधिक पिशव्या रक्त संकलित झाल्याचे शिवसेनामहानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचेडॉ.शिवाजी लहाड़े, ग़ौरव शितोले, प्रतिभा ढिकले,वैशाली मर्दे,सतीश वाघमारे,सचिन माने,अनिल जोशी, राजकुमार मोरे आदींचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे,राजेंद्र वाकसरे,किशोर निकम,वैभव ढिकले,शाम फर्नांडिस,यशवंत पवार,विजय बरकुल,मयूर जुन्नरे,बाळा अव्हाले,अविनाश सोनवणे,पवन अहिरे,सत्यजीत झांबरे रोशना जाधव, सोनल भालेराव,हर्षदा शिंदे, देवकी अहिरे,स्मिता अवसरें आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!