नाशिक मिरर वेबटीम : सातपूर औद्योगिक वाहतीमध्ये घंटागाडीखाली सापडून बावीस वर्षीय युवती ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि.१७ रोजी सकाळच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की मयत रोशनी हिने पीएसआय व पोलीस भरती होऊन देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगुन असलेली रोशनी ही सकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान मित्रासोबत पोलीस भरती चा धावण्याचा सराव करीत असताना युवती रोशनी केदारनाथ जयस्वाल (वय २२ वर्ष रा.कामगार नगर पाईप लाईन रोड ) ग्लेनमार्क कंपनी समोरील रस्त्यावर धावत असताना एका नादुरुस्त घंटागाडी (एमएच १५ एन ५११६ ) या ट्रॅक्टरला टोचन लावून चालेली घंटा गाडी च्या मागच्या नादुरुस्त गाडी (एमएच १८ एएन ३३७२) खाली अचानकपणे सापडली व तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्या मुळे उपचारासाठी रुग्णालयात नेते वेळीच युवती चा मृत्यू झाला आहे.सराव करतेवेळी रोशनी सोबत असणारा पोलीस भरतीचाच सराव करणारा मित्र उज्ज्वल राजु डोंगरे (वय :२२ रा.संतकबीर नगर) हा देखील जखमी झाला आहे.रोशनी ही महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्गात शिकत होती, तिला एकूण ५ बहिणी आहेत.रोशनी ही घरातील थोरली बहीण होती.तिचे वडीलाचे लॉकडाऊन नंतर कंपनी मधील हाताचे काम गेले होते.त्यामुळे ते सद्या मोलमजुरी करत आहेत.घरातील आई-वडील व पाच अविवाहित बहिणी अशी मोठी जबाबदारी रोशनी हिने आपल्या खांद्यावर घेऊन घरातील दारिद्र्य पोलीस मध्ये भरती होऊन देशसेवा करून घालवायचे असे स्वप्न रोशनी हिने बाळगले होते.परंतु काळ आला आणि सकाळी दुदैवाने तिच्या स्वप्नाचं घात केला.कामगार नगर व सातपूर परिसरातुन सदर घटने मुळे हळहळ व्यक्त केली जात असून, रोशनी च्या गेल्या मुळे सर्व कुटुंबा चा मोठा आधार गेला आहे. घंटागाडी चे चालकासह दोन कर्मचारी विटकर व नेटावटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत.
सातपूर मध्ये घंटागाडीचा ठेकेदार कोण ?यांची माहिती च विभागीय अधिकाऱ्याना नाही.सदर घटना होऊन १२ तास होऊन देखील सातपूरचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांना घंटा गाडी चे ठेकेदार कोण हेच माहिती नव्हते.त्यांनी दुसऱ्या अधिकारी यांना फोन करून सदर ठेका मे. सय्यद आसिफ अली या मालक व ठेकेदार कंपनी चा सदर ठेका असल्याची माहिती त्यांनी दिली. अधिक माहिती तपास करून सांगतो असे उत्तर नेर यांनी दिले.सदर दोन्ही घंटागाडी वाहन चालक यांच्या कडे वाहन परवाना ठेकेदार कडील घंटागाडी चा परवाना , सर्व कागदपत्रे व ठेकेदार यांची चौकशी करून दोषी वर कडक कारवाई करण्यात येणार आहे. –राकेश हांडे , वरीष्ठ पोलीस निरीक्षकसदर घटना दुदैवी असून सय्यद आसिफ अली या ठेकेदार कंपनी व नाशिक महानगरपालिका यांनी सदर गरीब कुटुंबातील मुलीला आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.सदर युवती चा अपघात होण्यास दोषी असलेल्या ठेकेदार वरून कडक कारवाई करण्यात यावी.प्रभागातील नगरसेवक या नात्याने आर्थिक मदत मिळवून देण्यास प्रयत्न करणार आहे.– सलीम शेख, नगरसेवक प्र. क्र.११ मनसे गटनेते नाशिक मनपा

