गीता जयंती धर्मसभाचे आयोजन

नाशिक मिरर वेबटीम : येवला मधील विंचुर येथे दरवर्षी प्रमाणे गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी गीता आश्रमाचे संस्थापक महंत भिंगारकर बाबा यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. धर्म सभेच्या अध्यक्ष स्थानी ह.भ .प भागवताचार्य कल्याणी निकम होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नंदूशेठ शेवाळे सभापती निफाड पंचायत समिती, लक्ष्मण निकम संस्थापक अध्यक्ष रत्न कण्या सेवाभावी संस्था नाशिक,रमेश भाग्यवन्त कार्याध्यक्ष रत्न कन्या सेवा संस्था, अलका निकम उपस्थित होते.सकाळी श्री मूर्तीस स्नान घालून ध्वजारोहण संत महंत व परिसरातील नागरिक याच्या शुभ हस्ते करण्यात आले. कु.आरती भिंगारकर यांनी ध्वज गीत गायले.
प्रमुख पाहुणे असलेले लक्ष्मण निकम यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने महिलेवर अन्याय का होतो. महिला या अन्याय सहन करतात म्हणून त्याच्यावर अन्याय होत असतात.परंतु या अन्यायाला महिला व तरुणी यांनी प्रतिकार केल्यास महिला कडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही.ह्या पुढे कुठल्याही मुलीवर अन्याय अत्याचार सहन केल्या जाणार नाही ,असे प्रतिपादन जाहीर धर्म सभेत निकम यांनी केले.यावेळी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!