नाशिक मिरर वेबटीम : येथील औद्योगिक वसाहतीतील नित्य होणारे वाढते अपघात पहाता वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या औद्योगिक वसाहती मधील मालट्रक,कंटेनर,टेम्पो अशा एकुण २० वाहनांवर नाशिक यूनिट ३ च्या वाहतुक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.
रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्या या गाड्यांच्या विरोधात विविध संघटना यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देखील दिले होते. परंतु उशिरा का होईना वाहतूक शाखेला जाग आल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
सदर कारवाई नाशिक यूनिट ३ चे वाहतूक पोलिस निरीक्षक सुभाष पवार व कर्मचारी यांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली. सातपुर,अंबड,इंदिरानगर या विभागामध्ये ही युनिट कार्यरत आहे.यापुढे देखील रस्त्यांवर पार्क करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे तसेच या वाहनांना ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक वहानास २०० रूपयाप्रमाणे दंड आकारण्यात आला, असल्याचे पवार यांनी सांगितले.यामुळे एमआयडीसी तील नागरीकांनी व काही वाहनचालकांनी वाहतुक पोलिसांचे कौतुक केले.

बातम्या

Don`t copy text!