नाशिक मिरर वेबटीम : नमो संवाद अभियान सप्ताह अंतर्गत नमो नमो मोर्चा भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी हटवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे प्रथम परिचय संमेलन संपन्न झाले.
      राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार हे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नाशिक येथे आले असता सोमेश्वर येथील महादेव मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेक,आरती करण्यात आली.या परिचय संमेलनाच्या सुरुवातीस भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
            यावेळी बोलताना विजय हटवार म्हणाले की,श्रीराम प्रभूंच्या पवित्र पावन भूमीतून महादेवांचा आशीर्वाद घेत नमो नमो मोर्चा भारतचा विस्तार करत सर्व पदाधिकारी युवा महिला पुरुष यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना स्वंयरोजगार इत्यादीवर भर देत येत्या काळात प्रशिक्षण वर्ग घेऊन पदाधिकारी व सदस्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी या माध्यमातून मी प्रयत्न करेल.सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक राष्ट्रीय प्रभारी तथा संयोजक सत्यप्रकाश सिंह यांनी राष्ट्रनिर्मितीच्या या  चळवळीत सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन करत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय मुख्य समन्वयक सोपान उंडे पाटील यांनी नमो नमो मोर्चा भारत संकल्पना विशद करत जनमोर्चा भारत की राष्ट्र प्रथम विचाराने प्रेरित असलेली देशातील सर्वात मोठी सामाजिक संघटना असून देशाचे ऊर्जावान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे ज्येष्ठ बंधू समाजसेवक  सोमाभाई मोदी यांच्या मार्गदर्शनासाठी कार्य करत असून देशातील वीस राज्यांमधून २० लाख सदस्य संख्या आहे.सामाजिक उपक्रम, मदतीचा हात ,पर्यावरण संरक्षण, महिला अत्याचार विरुद्ध लढा, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, इत्यादी सामाजिक विषयांवर काम करत असून अजून २०२४ पर्यंत नमो नमो मोर्चा भारताचा विस्तार दोन कोटी सदस्य संख्या गाठण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेश संघटनमंत्री सूर्यप्रकाश सिंह यांनी संघटना सदस्य ऑनलाईन पध्दतीने वाढविण्यासाठी आव्हान केले.
या कार्यक्रमाचे आयोजक नमो नमो मोर्चा चे नाशिक शहराध्यक्ष अँड.महेंद्र शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात नमो मोर्चा भारत चा विस्तार नाशिक मध्ये झपाट्याने करत वर्षभरात सदस्य वाढवत विस्तार करणार असल्याचे सांगितले.नाशिक शहर व जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
               यावेळी प्रदेश महिला महामंत्री व पालघर नगरसेविका अलका राजपूत,प्रदेश संघटन मंत्री सुर्यप्रकाश सिंह,प्रदेश महिला संघटन मंत्री किरण शिंदे,प्रदेश सह प्रवक्ता मनोज मिश्रा,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महिला सह संघटनमंत्री मोनिका सूर्यवंशी,प्रदेश कार्यालय प्रभारी पायल जैन,प्रदेश सोशल मीडिया प्रभारी अनुपम मिश्रा,पालघर जिल्हा अध्यक्षा कुसुम तिवारी,  सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिया बडगुजर,अंजना राँय,साईनाथ गाडे,मनोज शेट्टी,प्रमोद बेले,विनोद शुक्ला
,विजय चौधरी अतुल रावल,प्रदीप शुक्ला,आकाश सिंह
शशांक सिंह, शिवम तिवारी सरोज शुक्ला,वैभव मांडके,सोनू यादव्,सूरज सिंह,रितेश मिश्रा,शुभम शुक्ला,अर्जुन शिंदे,राजा परदेशी, प्रशांत शहाणे,सिध्दू खोचे,बाळासाहेब हाड़के, मिलिंद शिरसाठ,धिरज खोलंबे, शिवकुमार,अजय कुमार चौबे,संतोष शुक्ला,राकेश चोरड़िया,प्रदीप राँय, राकेशचन्द्र दुबे, साहेबराव दारूण्टे,गुड्डू भारद्वाज, शिवकुमार पांडे,अयोध्या यादव, कुलदीप दुबे, अमित जयसवाल,सुजीत यादव, विद्या तिवारी, सुषमा सिंह , प्रमिला उपाध्याय आदिसह नमो नमो मोर्चा भारतचे पदाधिकारी  उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!