नाशिक मिरर वेबटीम : सातपूरला दोन वेगवेगळ्या ठीकानी झालेल्या धाडसी घरफोडीत लाखोंचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली आहे.सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर कॉलनी आठ हजार भागातील रहिवासी नईम सय्यद यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर वरील खोलीत असलेल्या कपाट तोडत सोन्या चांदीच्या दागिना एकूण पाच लाख रूपये साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. दुसऱ्या घटनेत साई आशिष अपार्टमेंट गुलमोहर कॉलनी, पाईपलाईन रोड येथील संकेत नंदन दाणी यांच्या घरातील सात टोळे सोने व ४० हजार रोख अशा एकूण २ लाख १५ हजार रुपये रोख मुद्देमाल वर चोरांनी हात साफ करण्यात आला आहे.ऐन सणासुदीच्या काळात शहरातील मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, याकडे लक्ष देण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!