नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील समतानगर येथील सुमन तुकाराम जाधव ( वय : ६२ रा.रु.न २००५ एम.एच.बी.कॉलनी समतानगर ) हि महिला दि.२४ डिसेंबर २०२० रोजी ६.३० ते ८.३० च्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे.या महिलेचा तिच्या नातेवाईकांनी मंदिर,तसेच आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता ती महिला कोठेही मिळून आली नाही. ती हरवली अशी खात्री झाल्यावर तुकाराम चिमाजी जाधव यांनी पोलीसात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली.सुमन तुकाराम जाधव हि महिला शरिराने मजबूत, रंगाने गोरी,चेहरा उभट,नाक सरळ,उंची ५ फुट, ३ ईंच अंगात जांभळ्या रंगाची साडी,ब्लाउज, पायात चप्पल नाही. मराठी भाषा बोलते असे या महिलेचे वर्णन असून ही महिला कोठेही अढळल्यास सातपूर पोलीस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा.किंवा सातपूर पोलीस स्टेशन 02532305237 च्या नंबर संपर्क करावा.
