नाशिक मिरर : भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करीत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गंजमाळ परिसरातील भीमवाडी येथे राहणाऱ्या युवकाने दि.२ मार्च च्या रात्री गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान त्याने आत्महत्या करण्याआधी व्हिडीओ बनवून त्याच्या आत्महत्येस भद्रकाली पोलीस ठाण्यातील एक अधिकारी जबाबदार असल्याचे सांगितले.सदर व्हिडीओ (social media) व्हायरल झाला आहे. संबंधित पोलीस अधिकारी येता जाता धमकावत होते, घराची तपासणी करण्याच्या बहाण्याने घराबाहेर तलवार ठेवल्याचा आरोप या युवकाने व्हिडिओ मध्ये केला आहे.
