नाशिक मिरर वृत्तसेवा:  

सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज शनिवार, ( दि. ११ ) सकाळी सुमारे दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नविका अभिषेक नेरकर (वय ८, रा. मयूर स्वीटच्या पाठीमागे, आनंदवली पाईपलाईन रोड, सातपूर ही  आपल्या आजीसोबत दुचाकीवरून स्विमिंग करण्यासाठी निवेक क्लब येथे गेली होती. स्विमिंग झाल्यावर टीव्हीएस ज्युपिटर, क्रमांक एमएच १५ जेई ९१८१ या दुचाकी वाहनावरून घरी येत असताना एमआयडीसी तून पाठीमागून येणाऱ्या टाटा ट्रक क्रमांक-एम एच 17 बी डी ५०५ दुचाकीला जोरात कट लागला . त्यामुळे दुचाकीवरील तोल जाऊन आजी एकीकडे व नविका ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन ती जागीच ठार झाली.अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून सातपूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

 

या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी केली.तसेच रस्तावर अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली.पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नविका ही आनंदवली परिसरातील रहिवासी असून चिमुरडीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

…..

 

बातम्या

Don`t copy text!