नाशिक मिरर : खरेदी करण्याच्या बहाणा करत दुकानदाराचे लक्ष विचलित करुन पर्स मधील वीस हजार रुपये व एटीएम चोरी करनाऱ्या चौघा संशयित आरोपींना सातपूर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
     सातपूर  येथील अनुप संतोष भारती (२०) रा.रुम नं.२ अष्टविनायक कॉलनी,गणेश मंदिराजवळ अशोकनगर,विशाल सुरजपाल चेरे ( २३ ) रा.२,कला रो हाऊस,सातमाऊली चौक,श्रमिकनगर,जावेद उर्फ  साजन सलाहद्दीन अन्सारी (२४ ) रा. वास्तुनगर अशोकनगर,अमजद असाफिउल्ला खान (२७)रा.म्हाड़ा बिल्डींग,ए विंग,रूम नं.२०३,सातपूर त्रंबक रोड या चौघांनी इंदिरानगर येथील दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदराचे लक्ष विचलित करुन पर्स मधील रोख वीस हजार काढून घेत एटीएम चोरुन शहारातील किटकैट, मनाझ वाईन सातपूर कॉलनी व गंगापुर रोड येथे १७ हजार रुपये मद्य खरेदी केले.या बाबत इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
      दरम्यान इंदिरानगर पोलीसांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरातील  सर्वच पोलिस ठाण्याच्या अंतर्गत  या गुन्ह्याची महिती प्रसारित  यादी प्रसिध्द केली होती.
      सातपूरचे पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांना माहिती प्राप्त होताच  गुन्हे शाखेचे  सहा.पोलिस निरीक्षक हेमंत नागरे  व त्यांचे पथक यांना शोध घेण्याचे आदेश दिले होते.
      पोलिस नाईक आव्हाड व कासार यांना सदरचा गुन्हा सातपूरचे गुन्हेगार प्रवृत्तीचे अनुप भारती व त्याचा मित्र विशाल चेरे यांनी केल्याची खबर मिळाली.
      पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली पण या तपासाच्या दरम्यान हिस्टरी शिटवरील गुन्हेगार जावेद उर्फ साजन सलाहद्दीन अन्सारी याचेकडे चोरीचे एटीएम असल्याने त्याला त्याचा मित्र अमजद असाफीउल्ला खान यास ताब्यात घेतले.
    चौघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या हवाली केले.पाच दिवसात सदर गुन्ह्याची उकल झाली असल्याने सातपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
Don`t copy text!