सातपूर भारत बंद कृती समिती बैठकीत सातपूर बंद ची हाक
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम केंद्र शासनाचे शेतकरी विरोधी धोरण व कायदे लागू केले आहेत.यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.यामुळे शेतकऱ्यांचे दिल्लीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दि.६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता मारुती मंदिर सातपूर गाव या ठिकाणी बैठक घेण्यात आली. व सर्व शेतकरी, गावकरी व व्यापारी यांनी ८ तारखेला होणाऱ्या भारत बंद ला पाठिंबा देऊन त्या दिवशी सातपूर बंद ची हाक दिली आहे. सर्वांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सर्व सातपूर मधील व्यापारी, दुकानदार,हॉटेल व्यावसायिक,शेतकरी बांधव यांना करण्यात आली आहे.सातपूर भारत बंद कृती समिती चे डॉ.डी.एल कराड ,सीताराम ठोंबरे, दौलत निगळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक पश्चिम अध्यक्ष नितीन निगळ,आण्णासाहेब कटारे, शशी घाटोळ, हेमंत मौले, विजय भंदुरे चेतन भंदुरे, रवी काश्मिरे ,त्र्यंबक भंदुरे, कांतीलाल भंदुरे, छगन भंदुरे, पाटील बाबा, ठोंबरे सर गोरक्ष सोनवणे, भिवानंद काळे, निलेश भंदुरे , व मच्छिंद्र भंदुरे ,रवी भंदुरे ,दीपक मौले, सुरेश गोवर्धने,सुनील निगळ, सोमनाथ मौले,विलास घाटोळ, ग्रामस्थ, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
