सातपूर : नाशिक मिरर वेबटीम येथील जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मैत्री मेळाव्याचे आयोजन केले हाेते.शाळा व कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतानाच काैटुंबिक जबाबदारीत अडकुन जाताे. मात्र, ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ तशीच राहते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. त्यामुळे ३१ वर्षांचा मोठा कालखंड लोटल्यानंतरही जनता विद्यालय सातपूच्या शाळेतील १९८९ सालातील दहावीच्या बॅच मधील काही विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वांना एकत्र आणण्याची किमया घडवून आणली. प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने हे सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे विद्यालयातून १९८९ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. फक्त विद्यार्थीच नव्हे तर त्यांना ज्ञानाचे दान देणाऱ्या गुरुजनांचाही शाेध घेऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेतेे. मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. आपले वर्ग मित्र भेटल्याचा आनंदही सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. प्रारंभी सी.बी.पवार या शिक्षकांनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. विद्यार्थ्यांनीही ‘यस सर’ म्हणत आपली उपस्थिती दर्शवली. दीप प्रज्वलनानाने मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक ए.पी. पिंगळे यांची निवड करण्यात आली हाेती. व्यासपीठावर सेवानिवृत्त शिक्षिका मंगला पिंगळे, विमल उगले-जाधव, सुवर्णा शिंदे- काेकाटे, अँड. विजया शिंदे, तिलाेत्तमा वर्मा, भारती पवार, सखाराम घाटाेळ, शामराव गावले, शामराव महाले, देवराम काेल्हे आदी शिक्षकवृंद उपस्थित हाेते. माजी विद्यार्थी गाेरख तिडके, तानाजी दातीर, पत्रकार मनोज घोणे, श्रीराम हाबु, सदाशिव विधाते, विनाेद मेतकर, साेनल गवांदे, जयश्री तिवारी अादींनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थिनी डॉ. अनिता बेंडाळे यांनी सर्वांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. शाळेची माजी विद्यार्थीनी व विद्यमान शिक्षिका मिना देवरे अाणि प्रतिभा निर्मळ यांनी सुत्रसंचालन केले. पसायदान व राष्ट्रगिताने मेळाव्याची सांगता करण्यात आली.

बातम्या

Don`t copy text!