नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर 

            साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था, सातपूर कॉलनी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, सातपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका तसेच रिपब्लिकन पक्षाच्या गटनेत्या दीक्षा दिपक लोंढे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी दीक्षा यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाष्य करताना सांगितले की, “साहित्य हे केवळ शब्दांचे खेळ नसून ते समाज परिवर्तनाचे प्रभावी हत्यार आहे. शोषित, वंचित, कामगार व शेतमजुरांच्या व्यथा शब्दबद्ध करून जनजागृती करणारे महान विचारवंत म्हणजे अण्णाभाऊ साठे होते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केले. स्वागत रवी जगताप व ज्ञानेश्वर जमदाडे यांनी केले. यावेळीधिरज शेळके,रवि देवरे,रमेश शेवाळे,रामहरी संभेरावं,गणेश मौले,रमेश साळूखे, मुन्ना सूर्यवंशी, किरण साळवे, चेतन साळवे, वीरू जगताप, जयंती अध्यक्ष विजय जगताप, कार्याध्यक्ष योगेश खरात, योगेश साळवे, ज्ञानेश्वर शिरसाट, संजय थोरात, दिनेश आहिरे, कुणाल कासरले यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज आहिरे यांनी केले.

Don`t copy text!