रविवार रोजी परिसरातून भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन

नाशिक मिरर वृत्तसेवा : 
सातपूर मधील श्रमिकनगर मधील माळी कॉलनी मधील श्री विठ्ठल रुख्मिणी व श्री संत सावता महाराज मंदिर वर्धापन व श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने मंदिर परिसरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव आयोजन सोमवार दि. २१ जुलै ते सोमवार दि. २८ जुलै दरम्यान करण्यात आले आहे.

 

      रोज सकाळी ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, सायं ५ ते ६ हरिपाठ व रात्री ९ ते ११ वाजे पर्यंत श्री हरी कीर्तन होणार आहे. दि. २६जुलै हभप वासुदेव महाराज सोनवणे,रविवार दि. २७ जुलै रोजी सावता महाराज महाजन यांचे कीर्तन, यांचं दिवशी दु. ३ ते ६ परिसरातून भव्य दिंडी व पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार दि. २८जुलै रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प गोपाळ महाराज सांजोरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह ची समाप्ती होणार आहे.

 

       यावेळी भव्य महाप्रसादचे देखील आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम आयोजन मंडळाचे अध्यक्ष गोविंद बाबुलाल माळी, उपाध्यक्ष एकनाथ माळी, ज्ञानेश्वर थोरात, गुलाब दौलत माळी, राजेश महाजन, रवींद्र महाजन, दिलीप महाले, ज्ञानेश्वर महाजन, आदी सह सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य ज्ञानेश्वर पेहेरे, वाळू थोरात, प्रकाश महाजन, पोपट जेजुरकर, अँड देवमन शिंदे, श्री. महारुद्र हनुमान ना. सह. पतसंस्थाचे मिळाले.

बातम्या

Don`t copy text!