धार्मिक स्थळ खुले ; राज्य सरकारच्या निर्णयाचे मनसेच्या वतीने स्वागत
नाशिक मिरर वेबटीम :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्याची घोषणा करण्याच्या निर्णयाचे नाशिक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. सातपूर कॉलनी मधील आनंद छाया येथील दक्षिणमुखी साई बाबा मंदिरात सायंकाळ ची सांज आरती मनसेचे नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे यांनी महाआरती करत राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी मनसेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश निगळ, शहर सचिव अंबादास आहिरे, राजेश खताळे, वैभव महिरे, सचिन सिन्हा आदींसह मनसे पदाधिकारी व साई भक्त उपास्थित होते.

