आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते गंगापूर येथील बालाजी मंदिर महाभिषेक

भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले

नाशिक मिरर वेबटीम : गंगापूर येथील श्री बालाजी मंदिर बलिप्रतिपदा व दिवाळी पाडवा च्या मुहूर्तावर शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन नंतर भाविकांसाठी दर्शनासाठी सोमवारी आमदार सीमा हिरे, भाजप नेते महेश हिरे यांनी सपत्नीक महाअभिषेक, महाआरती करून मंदिर उघडण्यात आले. बालाजी मंदिर उघडण्यात आल्याने मंदिर परिसरात आमदार सिमा महेश हिरे, भाजपा पदाधिकारी महेश हिरे,रोहिणी नायडू,संगीता शेळके,रामहरी सभेराव,नारायण जाधव,अमोल इघें,राजेंद्र चिखले गौरव बोडके यांनी आनंदोत्सव साजरा केला.गेल्या चार महिन्यापासून मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनाला व लढ्याला यश आल्याचे मत आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले . दिवाळीनंतर नियमावली तयार करून , त्यानंतर मंदिरं उघडू असं म्हणणाऱ्यां मुख्यमंत्र्यांना पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

 

दिवाळीनंतर नियमावली तयार करून , त्यानंतर मंदिरं उघडू असं म्हणणाऱ्यां मुख्यमंत्र्यांना पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागलालढ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांचे आणि भाविक जनतेचे आम्ही अभिनंदन करतो. या निर्णयाचं स्वागत करतो. गेल्या आठ महिन्यांपासून देव आणि भक्तांमध्ये जी दरी तयार झाली होती , ती या पाडव्याच्या मुहूर्तावर आता मिटणार आहे . भक्ताला भागवंताच दर्शन घेता येणार आहे .आणि ज्या लाखो कुटुंबाची उपजीविका या मंदिरावर अवलंबून होती , त्यांच्या घरात चूल सुध्दा पेटणार आहे.
-आमदार सीमा महेश हिरे

बातम्या

Don`t copy text!