नाशिक मिरर वेबटीम : मुंबई  येथील अंधेरी पश्चिम व परिसरातील युवा कार्यकर्त्यांचा छावा क्रांतिवीर सेनेमध्ये जाहीर प्रवेश संपन्न झाला.या प्रवेश सोहळ्याला मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्षांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी म्हणून छावा क्रांतिवीर सेना ही संघटना उभी असणार आहे असे सांगितले. व पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक विधायक काम ही आपल्या सर्वांना करायची असून संघटनेचे प्रस्थ व नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे महत्त्वाचे आहे. युवक व तरुणांनी पक्षीय राजकारणात सहभागी न होता सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे व्यासपीठ स्वीकारणे गरजेचे आहे.
संघटनेच्या माध्यमातून राजकीय पक्षांची सुरू असलेली मक्तेदारी आपल्याला संपवायची असून राजकीय पक्ष हे जनतेच्या हिताची कामे न करता स्वतःच्या कुटुंबाला मोठे करण्याचे काम करताना दिसत आहे. त्यामुळे पक्षांचे राजकीय जोडे न घालता संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभारावी व येणाऱ्या काळामध्ये राजकीय घराणे,नेते हे सर्व सामान्य कुटुंबातल्या तरुणांची दिशाभूल करून स्वतःचा राजकीय फायदा घेत आहे. आणि ह्याच विरोधात आवाज उठवून सर्व राजकीय पक्षांचे दुकानदारी आपल्याला बंद करायची आहे.यावेळी मुंबई-कोकण चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर विशे यांनी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य स्थानी कार्यरत असलेल्या छावा क्रांतिवीर सेनेत दिवसागणिक कार्यकर्ते हे प्रवेश घेत असून संघटनेत येणाऱ्यांची ओघ वाढताना दिसत आहे.युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रेरणादायी व सर्व समावेशक असलेल्या नेतृत्वाला युवकांची पसंती मिळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेत अनेक प्रवेश सोहळे हे होत आहेत.
तळागाळातील समाज घटक,शेतकरी-कष्टकरी, कामगार,विद्यार्थी,महिला यांच्याशी निगडित समस्यांना न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून संघटेनेची ओळख ही संपुर्ण महाराष्ट्रात आहे. संघटनेत नियमित असंख्य तरुण कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी जोडले जात आहे. त्यातीलच एक भाग म्हणून मुंबईसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे वलय असताना देखील
करण गायकर यांच्या सारख्या युवा नेतृत्वाला प्रभावित होऊन
सामाजिक क्षेत्रात काम करणारी युवकांची एक नवी फळी होतांना दिसत आहे.।येणाऱ्या काळामध्ये मुंबई मध्ये संघटनेचे होणारे अधिवेश लक्षात घेता छावा क्रांतिवीर सेनेमध्ये मोठ्या असेच विविध भागांतील कार्यकर्त्यांचे प्रवेश सोहळे पार पडणार असल्याचा शब्द संघटनेचे रमेश पांडे अंधेरी संपर्कप्रमुख, दुर्गेश कामठेकर कार्याध्यक्ष अंधेरी पश्चिम, दिनेश खडतरे अंधेरी पश्चिम अध्यक्ष यांनी दिला आहे.
याप्रसंगी शिवचरित्रकार व संघटेनचे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील भोर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आज पर्यंतचा संघटेनचे प्रवास समजून सांगितला.यावेळी
चेतन शिंदे,प्रसाद देसाई,मंदार भोसले,लवकिक जाधव,सुदेश सरगार,योगेश हरपले,राहुल सागवेकर,भूषण खेतले,ओमकार पांडे,परेश अडथराव,अशितोष भोसले,अभिषेक करंजकर,सोहम निकम,निशांत दळवी,सिद्धांत दळवी ,आकाश पांचाळ ,जितेंद्र घाडगे,अशोक गायकवाड,विकी सकपाळ,अभिषेक खुशे,रितेश चव्हाण,शैलेश थालकर,अभिषेक राऊत,आकाश काते,करण पाटणे,संजय घाडे,रुचिरा जामसुटकर,बाबीत जमसुटकर,यश दळवी,सिद्धेश सागवेकर,सिद्धेश भोसले,विराज आंग्रे,संकेत मुलुक,शुभम सागवेकर,विनायक पांचाळ,प्रसाद वागमारे,मनोज धोत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!