नाशिक मिरर वेबटीम : नेहमीच विविध सामाजिक उपक्रमाद्वारे समाजासाठी झटणाऱ्या गरुझझेप प्रतिष्ठान च्या दुर्गप्रेमींनी सह्याद्री पर्वत रांगेतील मार्केडेय पर्वतावर यशस्वी चढाई केली. या दुर्गप्रेमींमध्ये वय वर्षे १२ ते वय वर्षे ७० पर्यतचा लहान विद्यार्थी व वृद्धांचा समावेश होता. या मोहिमेमध्ये स्वतः अस्थिव्यंग असून देखील हार न मानता १ जानेवारी २०२० ते १५ मार्च २०२० या ७५ दिवसात ११ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करुन जागतिक विक्रम करणाऱ्या अंजली प्रधान देखील सहभागी झाल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी अंजली प्रधान यांनी हरीहर किल्यावर यशस्वी चढाई केली होती.निसर्गाचा लहरीपणामुळे अचानक आलेल्या पावसाला शरण न जाता गरुडझेपच्या दुर्गप्रेमींनी मार्केंडयच्या शिखरापर यशस्वी चढाई केली .
प्रारंभी गडाच्या पायथ्यासी दुर्गप्रेमींकडून ९९४ सातत्यपूर्ण दिवस पूर्ण करत वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन देखील करण्यात आले.या प्रसंगी रेणू भानोसे , मानसी जोशी , प्रगती प्रधान , अंजना प्रधान , अजिंक्य तरटे , विकास प्रधान , रवींद्र कुलकर्णी , ज्योती भावसार , रतन भावसार , वैशाली व आदित्यवार्धन चव्हाण आदी दुर्गप्रेमी उपस्थित होते . यावेळी गरुडझेपच्या दुर्गप्रेमींकडून परीसराची स्वच्छता देखील करण्यात आली.
१९ डिसेंबर रोजी संदिप भानोसे वाहतूक सुरक्षा अभियानाचे १००० दिवस पूर्ण करत , नवीन ६ वा विक्रम रचला आहे .
