आधाराश्रय मित्र फाउंडेशन चा अनोखा उपक्रम देण्याचे सुख
नाशिक मिरर : 
                तुमच्याकडे वापराविना पडून असलेल्या सर्व जुन्या-नव्या वस्तू आम्ही मदत स्वरूपात स्वीकार तेही तुमच्या दारी येऊन अशी साद घालत शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुढे येण्याचे आव्हान आधाराश्रय मित्र फाऊंडेशनने पालकांना केले आहे या उपक्रमाद्वारे  आश्रमशाळा, अनाथ मुलं ,  महापालिका शाळेतील मुलांना आधार देणे हा फाउंडेशनचा उद्देश आहे.
            नवीन शैक्षणिक सत्राला नुकताच प्रारंभ झाला आहे. शाळेत जाण्यासाठी मुलांनी नवीन शूज, शैक्षणिक साहित्य, सायकल आदीची खरेदी केली आहे. परंतु, अनेकदा तर सर्वसामान्य व मध्यम कुटुंबामध्ये मुलांचा नवीन वस्तू खरेदीच्या हट्टामुळे जुने साहित्य वापराविना पडून राहते.
              खेड्यापाड्यातील, वस्तीतील अनेक विद्यार्थी असे आहेत की, ज्यांची नवीन वस्तू खरेदी तर काय जुनी वस्तू देखील बघायला मिळत नाही.आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे, गरजू विद्यार्थ्यांसाठी जुन्या वह्या-पुस्तके, पेन, स्कूल बॅग ,गणवेश, लंच बॉक्स, वॉटर बॅग, कंपासपेटी खेळाचे ,साहित्य टाकून देण्याऐवजी दान करण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना या वस्तू वापरण्यासाठी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना जुन्या शालेय वस्तूचे वाटप फाउंडेशनकडून केले जाईल.
          वस्तू देण्यासाठी पालकांनी ८१४९५०३६०९ , ८५५२९३९४४४ व  ७०५८६२५२८९ या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच फाउंडेशनचे कार्यकर्ते स्वतः पालकांचा घरी जाऊन वस्तू संकलित करणार आहेत. ज्या पालकांना किंवा दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल त्यांनी फ्लॅट नंबर ३ , श्री तिरुमाला हरी निवास,सद्गुरु नगर, गणेश नगर, रिलायंस पेट्रोल पंपाजवळ, पाईपलाईन रोड, सातपूर या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. हा उपक्रम नाशिक शहरासाठी मर्यादित असून ३ ऑगस्ट पर्यंत ही मदत स्वीकारली जाणार आहे.हा उपक्रम नाशिक शहरासाठी मर्यादित असून १ जून २०२२ पासून ते ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत ही मदत स्वीकारली जाणार आहे. सर्वांनी या उपक्रमासाठी मदत करावी असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष प्रा. मनोज सांगळे यांनी केले आहे. हे या उपक्रमामध्ये  दिलीप गंगोडे जगदीश निकम, अर्जुन पावसे, ऋतुजा मुसळे, शरद जोपळे ,भूषण राऊत ,शिवम पवार, मानसी शेजवळ ,ललिता मौले  ,प्राची तायवाडे ,योगिता बागुल, रविता नागपुरे, प्रतीक्षा शेजवळ, स्नेहल उफाडे, नेहा मुसळे, प्रज्ञा विजय, टीना जैन, चेतन जामदार, श्याम खोडे, सनी शिंदे, निलेश गायकवाड, अविनाश जाधव , कोमल उदावंत, हेमंत भामरे, पल्लवी वडजे, वर्षा पाटील, अदिती लोंढे, कल्याणी पवार, बालिका कसबे, गोकुळ दरगोडे, राहुल गीते , निवृत्ती सांगळे , मनीषा कुलकर्णी , अविनाश सोनवणे आदी चा सहभाग आहे.

बातम्या

Don`t copy text!