मित्रानेच केली दगडाने ठेचुन हत्या

नाशिक मिरर : 
सातपूर मधील गंगापूर कॅनॉल रोड वरील सोमेश्वर कॉलनी खांदवे नगर परिसरात दि.१जून रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान एका युवकाचा चाकूहल्ला करीत व दगडाने ठेचून त्याच्या मित्रांनीच खून केला. त्यामुळे परिसरात व नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

योगायोगाने यादरम्यान महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार याच भागातून जात असताना त्यांनी ही घटना पाहिली व आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्या काही किरकोळ जखमी झाल्या परंतु नागरिकांच्या मदतीने आरोपीस पकडण्यास यशस्वी झाल्या आरोपीस अटक करण्यात आली असून, या घटनेचे वृत्त समजतात पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत माहिती अशी, की मयत पवन नथू पगारे (रा. कानिफनाथनगर, श्रीकृष्णनगर, सातपूर कॉलनी) आणि संशयित आरोपी अतुल अजय सिंग (रा. सोमेश्वर कॉलनी) हे दोघे युवक मित्र काल रात्रीपासून परिसरात फिरत होते. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कॅनॉल रोड, सोमेश्वर कॉलनी परिसरात त्यांचा वाद झाला. या वादातून संतापलेल्या संशयित आरोपी अतुल अजय सिंग याने पवन पगारे याच्यावर चाकूहल्ला केला व नंतर दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. यात पवन पगारे याचा मृत्यू झाला. याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार यांनी ही झटापट पाहून धाव घेतली आणि आरोपीस पकडले.

या घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन संशयितास ताब्यात घेतले व घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!