नाशिक मिरर वृत्तसेवा : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या सातपूर परिसरातील ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकरंद साळी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपी संभाजी कवळे यास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सातपूर पोलिस स्टेशन व गुन्हेशाखा युनिट-२ यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. फिर्यादी आपल्या दुकानाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान संशयिताचा माग काढून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस स्टेशन व गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून पोलिस तपास सुरू आहे.सातपूर पोलिस ठाणे व गुन्हे शाखा युनिट-२ यांच्या संयुक्त कारवाईत चोरीचे सोने विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सुमारे १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत १४ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश आहिरे व गुन्हे शाखेचे अधिकारी हेमंत तोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात मानवी कौशल्याचा वापर करून चोरी केल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कारवाईत सातपूर पोलिस ठाणे व गुन्हे शाखा युनिट-२ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चहा, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके तसेच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखा युनिट पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे अनिल आहेर, रवींद्र जाधव, पारस देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार हेमंत खांडबहले, तेजस मते, पोलीस अंमलदार वीरनर यांनी केली आहे. यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विलास गीते व सचिन सुपले उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!