नाशिक मिरर वेबटीम : मनपाच्या आनंदवली शाळेची विद्यार्थिनी शितल विष्णू ठाकरे हिची स्पेस रिसर्च इंडियाच्या उपक्रमात बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनच्या स्पेस रिसर्च इंडिया अंतर्गत शाळेय विज्ञान शोध पकल्प प्रोजेक्ट आतर्गत ही निवड झाली असल्याची माहिती शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी दिली आहे.भारतीय विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले १००उपग्रह ७फेब्रुवारी ला अवकाशात श्री रामेश्वर येथून हाय अल्लटीत्यूड हेलियम बलून व्दारे सोडवणार आहे. हा उपक्रम माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजी अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व ‘ पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून या व्दारे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान तंत्रज्ञान आवड निर्माण करत भावी वैज्ञानिक तयार करणे हा असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही संस्था घेणार आहे. देशातील १०००विद्यार्थ्यांनाची निवड या उपक्रमात केली असून आनंद वली महापालिका शाळेतील विद्यार्थी शितल विष्णू ठाकरे हिची ५वि ते८ वर्ग गटात शितलची निवड करण्यात आली आहे. बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे.
शिक्षण सभापती संगीता गायकवाड उपसभापती शाहीन मिरझा यांच्या हस्ते तिच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला ए. पी.जे.अब्दुल कलाम फौंडेशनच्याचे सचिव मिलिंद चौधरी, मनिषाताई चौधरी,तसेच फौंडेशन चे कार्यकर्ता मनपा शिक्षक दिपक पगार कुंदा बच्छाव कैलास ठाकरे याचे सहकार्य लाभले

शाळेसाठी अभिमानाची बाब
शाळेतील विद्यार्थीनीच्या प्रोजेक्ट दखल स्पेस प्रोग्राम अंतर्गत होणे ही शाळेसाठी व सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
कुंदा बच्छाव
विज्ञान शिक्षिका

असा असणार उपक्रम
१०विद्यार्थ्यांनाचा गृप तयार करत २५ते ८० ग्रॅम वजनाचा १००उपग्रह तयार करण्यात येणार आहे. यात जीपीएस ट्रेकिंग, लाईव्ह कॅमेरा, असेल यात १०००मीटर उंचीवर ओझोन व कार्बन स्थितीची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

 

उपक्रमात उपग्रह म्हणजे काय त्याचे विविध भाग,सेंसर त्याचे कार्य कसे चालते, कुठले सॉफ्टवेअर वापरायचे, या बाबतीत ६ दिवस ऑनलाइन कार्यशाळा व पुणे येथे एक दिवशीय कार्यशाळा व प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे.

बातम्या

Don`t copy text!