नाशिक मिरर वेबटीम :
नाशिक येथील महिरावणी गावालगत असलेल्या दुडगाव येथे रंगनाथ बेझेकर (गट नंबर ५८ बुधवार( दि ६) रात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी बिबट्या पिंजऱ्यामध्ये बंद झाला आहे. महिरावणी दुडगाव भागात बिबट्याचा मुक्त वावर असून परिसरातील जनावरांवर हल्ले करीत होते. यामुळे वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. बुधवारी रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने पकडला गेला. वनपाल ओंकार देशपांडे,वनरक्षक साहेबराव महाजन ,सचिन अहिरे
यांचे परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले.अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून पिंजरा हा तिथेच ठेवावा जेणेकरून कुठल्या प्रकारची जीवितहानी होणार नाही. अशी विनंती स्थानिक गांवकरी रवि साळवे , राजाराम साळवे, तसेच बाळू बेंडकोळी यांनी केली आहे.
