डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
नाशिक मिरर वेबटीम : भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. भारतात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. कालच ड्राय रनही पार पडला. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची.दरम्यानच दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे.
