नाशिक मिरर वेबटीम : नवी दिल्ली भारतामधील सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. मेड इन इंडिया कोरोना लस COVAXIN ला परवानगी देण्यात आली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे जिच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.हैदराबादच्या भारत बायोटेकनं तयार केलेली ही लस. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CDSCO च्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. आता DCGI याबाबत अंतिम निर्णय घेईल. या निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152 लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं जारी केला होता. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला होता.

बातम्या

Don`t copy text!