नाशिक मिरर :
सातपूर,अंबड व सिडको हा परिसर कामगार वसाहती चा परिसर असल्याने येथील कुटुंब देखील उद्योगावर आधारित आहे.कारखान्यामध्ये कायम कामगारांच्या तुलनेत मोठ्या संख्यने कंत्राटी व ट्रेनी तत्वावर काम करणाऱ्या कामगार वर्ग यांची संख्या अधिक आहे. हाताला काम असेल तर पगार मिळतो अशी परिस्थिती. मार्च २०२० मध्ये पहिल्या लाटेत लॉकडाऊन मुळे २ महीने कारखाने बंद होते. त्यामुळे गरीब कुटुंब, मोलमंजुर, गरजु व्यक्ती व विधवा महिलांना अन्नधान्य, कोरडा शिधा, व अन्नदान करून समाजप्रती असलेले कर्तव्य सातपूर मधील जाधव संकुल परिसरातील शिवसेनेचे सातपूर उपविभाग प्रमुख लखन कुमावत यांनी पार पाडले.
विस्थापित गोरगरीबासाठी राज्य सरकारने चालू केलेल्या शिवभोजन थाली एक वरदान ठरली.सुरुवातीला थाळी साठी रुपये ५ ते १० रुपये द्यावे लागत होते.त्यामुळे अनेक वंचित लोक उभे राहून वापस जाताना दिसून आले.त्यामुळे दुसऱ्या दिवशी सातपुर व मेनरोड च्या शिवभोजन केंद्रावरील प्रत्येकी ३०० शिवभोजन थाळी ची जबाबदारी घेऊन तेथील लोकांना मोफत जेवन वाटप करण्यात आले.दुसऱ्या लाटे मध्ये राहत असलेल्या प्रभाग २६ मध्ये सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब राहत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सीजन, औषध यासाठी मदतीसाठी फोन येत होते. अनेकाना संपर्कद्वारे बेड मिळवून दिले.यावेळी मदत मिळालेल्या कुटुंबानी दिलेल्या आशीर्वाद मुळे काम करण्याची अधिक ऊर्जा मिळाली. पॉझिटिव्ह रुग्णांना फोन द्वारे अथवा भेट घेऊन मानसिक आधार दिला.गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात उपचार उपलब्ध करून दिले.अनेकांचे शिवसेना पक्ष व मनपा ऑडिटर यांच्या माध्यमातून रुग्णांचे अवास्तव बिल कमी दिले.
सातपूर परिसरात मोठे कुटुंब व छोटे घरे अशी परिस्थिती असल्याने कुटुंबातील एका बाधित रुग्ण मुळे योग्य काळजी न घेतल्यास घरातील इतर बाधित होऊ शकतात. म्हणून त्यांना विलगिकरण सेंटर मध्ये ठेवणे आवश्यक असते.परंतु सातपूर कोविड़ सेंटर नसल्याने रुग्ण शहरात दूर जाणे टाळत होते.म्हणून सातपुर येथे रेशिमगाठी लॉन्स येथे सर्व नेते, नगरसेवक, युवानेते, डॉक्टर या सर्वाणि एकत्र येऊन एक आदर्श अस कोविड़ आइसोलेशन सेंटर सुरू करण्याच ठरवलं. व वडील कै. अण्णासाहेब कुमावत यांच्या स्मरणार्थ ११ हजार रुपये देणगी देऊन समाजप्रति एक कर्तव्य पूर्ण केले. प्रभागातिल नागरिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ति वाढ़ावी म्हणून आर्सेनिक अल्बम च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
माणूस हा पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल पण गरज पडेल तेव्हा मनाने समाज प्रति श्रीमंत असलाच पाहिजे. याच भावनेतून मी यापुढे कोरोना महामारी च्या संकट काळात शक्य तितक सामाजिक कार्य सुरू ठेवणार आहे.-
लखन कुमावत, उपविभाग प्रमुख शिवसेना सातपूर

