नाशिक मिरर :

गेल्या वर्षभरा पासून कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विस्थापित कामगार,मोलमंजुर, वेठबिगारी, रोजंदारी वर काम करणाऱ्या कुटुंबाचे काळात मोठे हाल झाले.रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागेवर पाल ठोकून राहायचे.नाक्यावर मिळेल ते काम करून दिवस भरावयचा. मंजुरी मिळाली की जेवायचे नाहीतर उपाशी झोपायचे असे याचे जीवन. परंतु लॉकडाऊन मुळे रोजगार मिळेनासा झाला.असे मोलमंजुर त्याच्या कुटुंबाचे हाल होऊ लागले.

 

अशा विस्थापित गोरगरिबांना मदती साठी रत्नकन्या सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण निकम व त्याचा परिवार ,पदाधिकारी व सदस्य यांनी जाधव संकुल,अंबड लिंक रोड, चुंचाळे, आदी भागांतील ११ हजार कुटुंबाना कोरडा शिधा वाटप करून कोरोना काळात आपली सामाजिक बांधिलकी जपली. मरावे तरी कीर्ती रुपी उरावे या ओवी प्रमाणे निस्वार्थी पणे वर्षभरापासून गोरगरीब गरजू कुटूंबाना मदत करून त्याचे अन्नदाते झाले आहेत. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमोपॅथिक आर्सेनिक गोळ्या चे ही वाटप केले. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटर पर्यंत स्वमालकीच्या वाहनात
मोफत घेऊन जाण्याचेही काम करीत आहेत.

कोरोना मुळे ज्या कुटुंबातील कर्ता पुरुषाचे निधन झाले अशा कुटुंबापर्यंत पोहचुन त्यांना मानसिक आधार देण्यासोबत आर्थिक मदत देखील केली.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मानसिक आधार देत, कोरोना वर मात करता येते आणि ती न घाबरता करा, तुम्ही कोरोनवर निश्चितच विजय मिळवाल अशी हिंमत देऊन त्यांनी रुग्णाचा आत्मविश्वास ही वाढविला.
यापुढील काळात देखील सामन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे लक्ष्मण निकम यांनी सांगितले.निकम यांना त्याच्या या सामाजिक कार्यात संस्थे चे पदाधिकारी रमेश भाग्यवंत, गौरव शहापुरकर, ललिता शिंदे, लोकेश कटारिया, अलका निकम, गणेश निकम, वैशाली पाटील ,नलिनी पवार, रोशन जाधव, स्वप्नील निकम, संतोष गाढे ,ज्ञानेश्वर नवले आदी मोलाची साथ देत आहे.

बातम्या

Don`t copy text!