गायकर कुटूंबांचे सांत्वन केल्यानंतर आरक्षण मुद्यावर भाष्य
नाशिक मिरर :
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हा माझा प्राधान्यक्रम असून , मराठा सकल समाजाच्या आरक्षण संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे. ज्या भावना समाजाच्या त्याच माझ्याही आहेत.हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटीबध्द राहणार आहे.परंतु आज आपण कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत.या महामारीत प्रत्येकाने आपला जवळचा कुणीतरी गमावला आहे.जीवन मरणाची ही लढाई जिंकणे हे आपले या क्षणाचे पहिले काम आहे.माणसं जगली तर मिळालेले आरक्षण देखील सार्थ ठरेल.ही लढाई जिंकल्यानंतर आरक्षणासाठी मी स्वतः समाजासोबत रस्त्यावर उतरेल.अशा शब्दात छञपती खा.संभाजी राजे भोसले यांनी आरक्षण मुद्यावर करण गायकर यांच्या कुटूंबांचे सांत्वन केल्यानंतर आरक्षण मुद्यावर भाष्य करतेवेळी प्रसार माध्यमांशी बोलते वेळी त्यांनी सांगितले.
समाजाचे रस्त्यावरचे आंदोलन सामुहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल असे ते म्हणाले. छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर गायकर कुटूंबांचे सांत्वन करण्यासाठी छञपती संभाजी राजे नाशिक दौऱ्यावर आले होते.तेंव्हा पञकारांनी आरक्षण मुद्यावर छञपतींना विचारले असता तेंव्हा त्यांनी आपली सदर भुमिका स्पष्ट केली.यावेळी विलास पांगरकर,प्रमोद जाधव,तुषार जगताप, नगरसेवक योगेश शेवरे,सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे,बाळासाहेब लांबे,नितीन निगळ,नवनाथ शिंदे,भारत पिंगळे,प्रितेश पाटील,गणपत जगताप,तुषार पाटील,निलेश शेजुळ,सोनू काळे,अविनाश गोसावी होते.
रूग्ण वाहिका लोकार्पण करण्याचा मान तुषार जगताप यांना –
छञपती खा.संभाजी राजे भोसले गायकर कुटूंबांचे सांत्वन करण्यासाठी आले असता शिवतिर्थ प्रतिष्ठानतर्फे रूग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.छञपतींच्या हस्ते हे लोकार्पण निश्चित करण्यात आले होते.तथापी छञपतींनी हे लोकार्पण करण्याचा मान आरोग्यदूत तुषार जगताप यांना दिला.गेली दहा पंधरा वर्षापासून तुषार जगताप समाजाच्या आरोग्यासाठी काम करीत आहेत.विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आॕक्सीजनचा तुटवडा भासत असल्याने श्वास कोंडलेल्या अत्यवस्थ रूग्णांसाठी युवराज संभाजी राजे छञपती वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आॕक्सीजन सिलेंडर निःशुल्क उपलब्ध करून देत शेकडो रूग्णांचे प्राण वाचवले.म्हणून रूग्णवाहिका या जीवन वाहिनीचे लोकार्पणही या आरोग्य दुताच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त करून छञपती भोसले यांनी रिबन कापून श्रीफळ वाढविण्याचा मान तुषार जगताप यांना दिला.
“नाशिक जिल्ह्यातील आजचा दौरा कुठलाही राजकीय दृष्ट्या नसून गायकर कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलो असून त्यांच्या आयुष्यातील पडलेली ही पोकळी भरून काढण्यासाठी नेहमीच त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभा राहून कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल. त्याच बरोबर शिवा तेलंग यांच्या मातोश्री ज्ञानेश्वर थोरात यांचे भाऊ मराठा क्रांती मोर्चा निलेश गायके, सामाजिक कार्यकर्ते रोशन घाटे यांचेही दुःखद निधन या काळात झाले. त्यांच्याही कुटुंबांसोबत मी सदैव पाठीराखा म्हणून उभा राहील
-खा.संभाजी राजे भोसलेछोट्या छोट्या गोष्टीची दखल घेऊन रयतेच्या भावना जपणारा राजा खरा लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखला जातो.आज रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्याची राजेंनी मला दिलेली संधी ही माझ्यासारख्या सामान्य मावळ्याच्या पाठीवर राजाने मारलेली अविस्मरणीय थाप आहे.या शाबासकीतून प्रेरणा घेत सामाजिक काम सातत्याने सुरू राहील.
-तुषार जगताप ,आरोग्यदूत नाशिक

