कामगारानामध्ये आनंदाचे वातावरण
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम
सातपूर औद्योगिक वसाहतीतिल आटोमोबाईल वाहन क्षेत्रातील सर्वात मोठी व शहरातील मदर इंडस्ट्री म्हणून नावलौकिक असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कामगारांना कामगारांच्या सेवाजेष्ठतेनुसार पन्नास हजार ते एक लाख रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कंपनीतील युनियन चे सरचिटणीस सोपान शहाणे यांनी दिली आहे. कोविड १९ मुळे जगभरासह देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यामध्ये देशातील उद्योगधंदे विशेष करून ऑटोमोबाईल सेक्टर उपवाद ठरले नाहीत.परंतु अशा संकटात देखील देशातील उद्योगधंदे पुन्हा भरारी घेतली असून आता पुन्हा जोमाने सुरू झाली आहेत.

बोनस जाहिर झाल्यामुळे यंदा कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. कोरोना काळातील मंदीचा फटका बसला असला तरीही महिंद्रा कंपनी व्यवस्थापण यांनी युनियन पदाधिकाराऱ्यांसोबत मुबई येथे सोमवारी बैठक झाली. सकारात्मक निर्णय घेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी बंपर बोनस जाहीर केला आहे.यात कामगारांना प्रत्येकी किमान सेवाजेष्ठतेनुसार ५० हजार ते १ लाख बोनस मिळणार असल्याचे महिंद्रा युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण व सरचिटणीस सोपान शहाणे यांनी सांगितले. महिंद्रा कंपनीवर या बोनस जाहीर झाल्याने याचा नाशिक व्यापारी मार्केट मध्ये चलन वाढनार आहे. बोनस व पगार मिळून काही लाख कामगारांच्या हातात पडणार असल्याने खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.कामगार बरोबर व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान, मुंबईत झालेल्या फेडरेशनच्या बैठकीला युनियनचे सरचिटणीस सोपान शहाणे, योगेश चव्हाण अध्यक्ष, राजेंद्र पवारउपाध्यक्ष, सचिव परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन्स भंडारी, सदस्य सुनील अवसरकर व भुवणेश्वर पोई उपस्थित होते.
