दोन संशयित अटकेत ; जळगांव जिल्ह्यात खळबळ 

जळगांव : नाशिक मिरर वेबटीम जळगांव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात वीस वर्षीय दलित तरूणीचे अपहरण करत तिच्यावर सामुहिक बलात्कार करून हत्या केल्याची माणुसकीला काळींबा फासणारी घटना दि.१० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. विषारी औषध देवून हत्या केल्याचा खळबळजनक आरोप मयत तरूणीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पारोळा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील २० वर्षीय दलित तरूणीचे अपहरण झाल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी बेपत्ता युवती बसस्थानकाच्या मागे बेशुध्दावस्थेत आढळून आली. काही नागरीकांना तिला बेशुध्दावस्थेत तातडीने धुळे रूग्णालयात हलविण्यात आले. आज दि. १० रोजी पहाटे पिडीत तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मुलीवर बलात्कार करून तिला विषारी औषध देण्यात आल्याचा आरोप मुलीच्या मामाने केला आहे. मेडीकल रिपोर्ट नुसार मुलीवर दोन ते तीन जणांना सामुहिक बलात्कार केला असून पाण्यात विष देवून पाजण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!