अरुंद रस्ता रुंद करण्याची मागणी
सातपूर :पुढारी वृत्तसेवा तब्बल चार वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातपूर -सिडको व अंबड ला जोडणारा आय.टीआय पूल खऱ्या अर्थाने नागरिक व वाहन चालकांकरता खुला करण्यात आला आहे .

फोटॊ : आय.टी.आय.पुल : रस्त्याचे सुरू असलेले काम व त्याप्रसंगी उपस्थित नगरसेविका हर्षदा गायकर , मनपा बांधकाम अधिकारी व कर्मचारी
आयटीआय पुलासाठी प्रयत्न केला मनसेच्या एका माजी नगरसेवकाने त्याला मंजुरी मिळवून आणली भाजपाच्या दुसऱ्या एका नगरसेविकेने आणि आता हा रस्ता नागरिकांसाठी खुला केलाय तो शिवसेनेच्या एका तिसऱ्या नगरसेविकेने . त्यामुळे सध्या तरी या पुलाच्या श्रेयाचे मानकरी तिघही नगरसेवक दिसून येत असतांना मागील चार वर्षांपासून पुलाचे काम होत नसल्याने मेटाकुटीस आलेले नागरिक याचे श्रेय नेमके कुणाला देतात ते येणाऱ्या मनपाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदान पेटीतून बघायला मिळेल . मात्र असं असलं तरी सध्या मात्र पुलाचा मार्ग एकदाचा खुला झाल्याने वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी सदर कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे . प्रभाग २६ मधील आय.टी.आय. पुल सुरू करण्यासाठी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी मनपामार्फत ६ जुलै रोजी सदर ठिकाणी उपस्थित राहून पुल हा नागरिकांसाठी खुला करावा व त्याचबरोबर डांबरीकरण करावे,अशी मागणी सातपूर बांधकाम उपअभियंता संजय पाटील यांच्याकडे सातत्याने केली . अखेर गुरुवारी ५ नोव्हेंबर २०२० ला डांबरीकरण करण्याचे काम चालू करण्यात आले .आता काम पूर्ण झाले आहे.परंतु रस्ता मधील अतिक्रमण काढून अरुंद रस्ता रुंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रसंगी शिवसेना नगरसेविका तथा आरोग्य समिती सदस्य हर्षदा गायकर व बांधकाम विभाग अधिकारी उपस्थित होते .
