नाशिक मिरर :  कोविड १९ संसर्गजन्य महामारी रोगा पासून बचावासाठी नागरिकांना नाशिक शहरात मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सातपूर विभागासाठी पाच केंद्रे असून या पाच केंद्रांवर आजपर्यंत कोविशिल्ड व कोव्हक्सीन चे ३२ हजारांच्यावर नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. अशी माहिती एमएचबी कॉलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी शीतल पगार यांनी दिली.

 

सातपूर विभागासाठी सर्वप्रथम मनपाच्या मायको रुग्णालयात त्यानंतर ईएसआय रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एमएचबी कॉलनीतील मनपा रुग्णालय, गंगापूर गावातील मनपा रुग्णालय आणि संजीवनगर येथेही लसीकरण केंद्राची सोय करण्यात आली आहे.सदर लसीकरण केंद्रावर नागरिक लस घेण्यासाठी पहाटे ५ वाजेपासून नंबर लावत असल्याचे दिसून येत आहे.सदर सर्व ठिकाणी टोकन पध्दतीने व ऑनलाईन नोंदणी व अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने देशात दि. १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास मंजुरी दिल्यानंतर सुरुवातीला फक्त कोरोना वॉरिअर्स,फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षे वयावरील नागरिकांनाच दिली जात होती. त्यानंतर ४५ वर्षेवयावरील नागरिकांना देण्यात आली. आणि आता दि. १ मेपासून १८ ते ४४ वय असलेल्या युवकांना सुरू केली आहे.परंतु लसीचा पुरवठा केंद्राकडून व लस बनवणाऱ्या औषध कंपनी कडून कमी होत असल्याने,सद्या स्थिती मध्ये १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण बंद करण्यात आले आहे.

नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी गर्दी करू नये,लसीकरण केंद्रावर टोकन पध्दतीने व ऑनलाईन नोंदणी, अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.आदेशानुसार सद्या ४५ वया पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.लसीचा पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी घाबरून न जाता. मास्क वापरणे, स्वच्छ हात धुणे, सामाजिक अंतर ६ फुटाचे अंतर पाळणे,घरातून कामाशिवाय निघू नये. – शीतल पगार , वैद्यकीय अधिकारी एमएचबी कॉलनी सातपूर नाशिक मनपा

बातम्या

Don`t copy text!