नाशिक मिरर : नाशिकमधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकली आहेत. बाजारात प्रवेश हवा असेल तर आता थेट पैसेच मोजावे लागणार आहेत.

 

बाजारात जायचे असल्यास प्रति तास पाच रुपये शुल्क.

एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारात थांबल्यास ५०० रुपये दंड.

– वाढत्या करोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते केले बंद.

– बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार.

– महापालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करणार.

– शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांची बॅरिकेडिंग. महापालिकेचा प्रत्येक पॉइंटवर टेंट असणार.

– बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार. पासधारकांनाच असेल प्रवेश.

– मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू.

– सकाळी ८ ते रात्री ८ पोलीस तैनात असणार. ८ नंतर कुणालाही परवानगी नाही

बातम्या

Don`t copy text!