नाशिक मिरर : नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पत्नीच्या निधनाची बातमी ऐकून पतीची आत्महत्या केल्याची घटना श्रमिकनगर परिसरात दि.३०मार्च रोजी पहाटे च्या सुमारास घडली.
श्रमिकनगर येथील माळी काॅलनी येथे राहणारे संगीता रवींद्र पवार (वय ४४) या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सोमवार दि २९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरु असतानाच रात्री तिचे अचानक निधन झाले.त्यावेळी रूग्णालयात त्या महिलेसोबत दोन्ही मुले होती.या बाबत ही घटना आज मंगळवारी पहाटे घरी तिच्या मुलाने वडिलांना फोनवरून कळविली.थोड्या वेळाने मुलाने पुन्हा फोन केला असता वडील फोन का उचलत नाही, म्हणून शेजारच्या लोकांना सांगितले असता, शेजारी राहणारे घरी आले व त्यांना आवाज देत होते.पंरतु आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी खिडकीतून डोकावले असता त्यांना रवींद्र तुळशीराम पवार ( वय ५२ )यांनी फॅनला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. ते सातपूर औद्योगिक वसाहती खासगी कंपनीत कामाला होते. वय जास्त असल्याने ते काही दिवसांपासून घरीच होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
पत्नीच्या मृत्यूनंतर काही तासांत नवऱ्याने जीवन यात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची प्राथमिक माहिती सातपूर भाजपा मंडल चे अध्यक्ष अमोल इंघे यांनी अशोकनगर पोलीस चौकी येथे जाऊन दिली. सदर घटनेमुळे सातपूर व नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात असून घटना स्थळी अनेकांचे डोळे घटने मुळे पाणावले होते.
