नाशिक मिरर : कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, पोलीस, सफाई ,कामगार यांच्यासोबत नागरिकांच्या जीवनातील जीवनावश्यक गॅस सिलेंटर डिलिव्हरी काम करणारे कामगार कोरोना व्हायरस चा सामना काम करत आहेत. कोरोना काळात पॉझिटिव्ह पेशंट मुळे अनेक बिल्डिंग सील झालेल्या असताना ज्या घरात कोरणा पेशंट आहे अशा घरात सुद्धा सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कामगारांनी गॅस सिलेंडर पुरवलेले आहे.
सदर गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या कामगारांना माथाडी मंडळात करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र औद्योगिक व माथाडी कामगार विकास सेना च्या वतीने करण्यात आली आहे. या कामगारांचा देखील कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करणे आवश्यक आहे. गॅस एजन्सी चालक वितरक यांना कोणतीही सुरक्षा साधने देत नाही, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर ,पायात सेफ्टी शूज सुद्धा या कामगारांना मिळत नाही.खांद्यावर घेतलेले जड सिलेंडर जर कधी त्यांच्या पायावरती पडले तर कायमची दुखापत कामगारांना होऊ शकते, सिलेंडर ने भरलेला टेम्पो रस्त्याने घेऊन जाताना अनावधानाने अपघात झाला, तर त्यात 30 ते 40 सिलेंडर एकामेकावर ती गॅस ने भरलेले असतात ,मानवी वस्ती मध्ये गल्ली बोळा मध्ये या गाड्या सर्रासपणे वावर करत असतात अनावधानाने अपघात झाला तर आग विजवण्याची सुरक्षा साधने या कामगारांना जवळ नसते म्हणून मोठी जीवित हानी होऊ शकते, खांद्यावरून गॅस ने भरलेला सिलेंडर घेऊन बिल्डिंग च्या शेवटच्या माळयापर्यंत सिलेंडर घेऊन जाणे आणि उतरणे त्यांच्यामुळे कामगारांना मानेचं कमरेचा व गुडघेदुखीचे असे अनेक विकार जडलेल्या आहे, कामगारांच्या शरीराची झीज होत असताना इतर कामगारांच्या तुलनेत ते कामगार खूप कमी दिवस काम करू शकतात नंतर या कामगारांकडून कामच होऊ शकत नाही. ओझी वाहून नेणे उचलणे हे माथाडी कामगार मध्ये काम मोडत असल्यामुळे या कामगारांची माथाडी मंडळात रजिस्टेशन करून कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी माथाडी कामगार विकास सेनाच्या वतीने संघटनेचे संपर्कप्रमुख रवींद्र देवरे यांनी केली आहे.सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व कामगार उपायुक्त,माथाडी मंडळ अध्यक्ष कामगार भवन येथे देण्यात आले आहे.
