शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम विधानसभा अध्यक्ष नितीन बाळा निगळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्हयातील शेकडो नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी दि.०१ नोव्हेंबर रोजी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम विधानसभा अध्यक्ष नितीन बाळा निगळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, अशोक सावंत,जेष्ठ पदाधिकारी मनोहर बोराडे, जीवन रायते, जय कोतवाल, निलेश भंदुरे,रामदास मेदगे,कमलेश कांडेकर, सुनिल घुगे, संतोष भुजबळ,समाधान तिवडे,भावेश निर्वाण आदि उपस्थित होते.राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहरात करत असलेले सामाजिक कार्य व नागरिकांचे सोडवीत असलेले प्रश्न आणि यातून युवा पिढीमध्ये निर्माण होत असलेली क्रेझ बघता सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आकर्षित होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून जनतेच्या हिताकरिता घेत असलेल्या निर्णयामुळे संपूर्ण युवा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आकर्षित होत आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ अनेक जनहितार्थ निर्णय घेत असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित आढावा बैठक सुरु आहे. या बैठकांमुळे जनता कर्फ्यू न करता सर्वात जास्त कोरोना मुक्त रुग्ण नाशिक जिल्ह्यात होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस विविध कामांच्या माध्यमातून नाशिककरांचे प्रश्न सोडवीत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे हे सर्वसामान्यांना लक्षात येऊ लागल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे युवक वर्गाचा कल वाढत आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील निष्ठा व पक्षसंघटनेसाठी काम करण्याची उत्सुकता बघता या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगनराव भुजबळ व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे आचार-विचार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची ध्येयधोरणे तसेच शासकीय योजनांचा लाभ युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या पोहचवून पक्षात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली. प्रवेश घेतलेल्या या कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळकटी प्राप्त होणार असून नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हे नाशिक शहर व परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितात. तसेच नाशिककरांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कायम अग्रेसर असते. या दृष्टीने नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाची ताकद सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या वाढत असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या भावी राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सनी रॉय , खुशाल खैरनार , श्रेयस इमानदार, रुपेश बैरागी ,शुभम महाजन, विठ्ठल सव्वाशे , कार्तिक भोसले, राहुल रायते,अरविद पैठणकर, कुणाला पाटील दादु बोरसे आदींसह नवनिर्वाचित शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
