नाशिक मिरर वेबटीम : – माजी आमदार डॉ. निशीगंधा मोगल यांनी सैनिक कल्याणासाठी ध्वजनिधी म्हणुन स्वत:चे स्त्री धन म्हणजेच रुपये २० लाख किंमतीचे दागिने मोडुन आलेली रक्कम ही सैनिक कल्याण निधीला अर्पण केली. निशीगंधा मोगल यांनी केलेल्या वेगळया उपक्रमाची दखल शहर महिला भाजप आघाडीने घेवून आज त्यांच्या निवासस्थानी जावून भाजप महिला आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, रोहिणी नायडु, रोहिणी दळवी, शिल्पा परनेरकर, तृत्प्ती कुलकर्णी, पूर्वा सावजी, मनिषा देवरे, रश्मि हिरे बेंडाळे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सांगितले की, प्रत्येक महिलेला तिचे दागिने म्हणजेच “स्त्रीधन” हे फार प्रिय असते तिच्या आयुष्याभरच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या असतात असे सांगतांना माननीय निशीगंधाताईंनी देशाच्या सीमेवर भारतीय जवान आपल्या प्राणाची बाजी लावुन देशवासियांची सुरक्षा करत असतात या बांधवांना प्रसंगी प्राणाची आहुती देखिल द्यावी लागते त्यांच्या कुटुंबियांना ध्वजनिधीतून ही मदत दिली जाते याकरिता देशाबद्दलचे प्रेम व सैनिकांबद्दल असलेले आपले कर्तव्य या भावनेने प्रेरित होवून समाजाचे आपणही काही देणे लागतो या उदात्त हेतुने त्यांनी आपले स्वत:चे सर्व स्त्रीधन अर्पण करुन सैनिकांच्या कल्याणासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला त्यांनी केलेल्या या आगळा वेगळा उपक्रम हा कौतुकास्पद आहे .

बातम्या

Don`t copy text!